अभिनेत्री सई लोकूर बेळगावात करणार पहिल्या बाळाचं स्वागत | पुढारी

अभिनेत्री सई लोकूर बेळगावात करणार पहिल्या बाळाचं स्वागत

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री  सई लोकूर येत्या काही दिवसांमध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. गरोदरपणा  नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली. सई व तिचा पती तीर्थदीप रॉय लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे पालक होणार आहेत.

फोटो शेअर करताना म्हणाली, मी माझ्या जन्मगावी म्हणजेच बेळगाव इथे माझ्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहोत. आम्हाला मुलगा होईल की मुलगी याचा फरक पडत नाही. खरं तर, आम्ही नुकतेच गोव्यात आमच्या बेबीमूनसाठी गेलो होतो. मी स्वतःची काळजी घेत असून सुरुवातीचे काही दिवस थोडे आव्हानात्मक होते. कारण मला थकवा जाणवत होता. मला ॲसिडिटीचा त्रास व्हायचा, पण तो काळही मी खूप एन्जॉय केला. माझ्या शरीरात एक जीव वाढत आहे. मला आठवतं की जेव्हा मला पहिल्यांदा उलटी झाली तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आणि त्या डॉक्टर म्हणाल्या ‘सगळं ठीक आहे, तू लवकरच आई होणार आहेस’. त्यातूनच मला आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. माझे पती तीर्थदीप आणि मी सध्या वेगवेगळ्या भावनांमधून जात आहोत.

मी माझ्या मैत्रिणी शर्मिष्ठ राऊत आणि मेघा दाढे यांना याबाबत माहिती दिली, तेव्हा त्या खूप उत्साहित झाल्या आहेत. मी आईसोबत फुकेतला जाणार होते, त्यापूर्वी मेघा मला काही तास मुंबईत भेटली होती,” असेही सईने सांगितलं आहे.

“मी पडद्यावर कधी परतणार, याबद्दल लोक मला अनेकदा विचारत आहेत, पण माझ्या लग्नानंतर मी माझ्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी ठरवून ब्रेक घेतला. मी ३५ वर्षांची होण्याआधी मला आई व्हायचं होतं, जेणेकरूण माझ्या बायोलॉजिक चक्रात अडथळा येणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी रुपेरी पडद्यावर येईन, असेही तिने म्हटले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button