पिंपरी : वाल्हेकरवाडीतील घरांचे वाटप कधी? | पुढारी

पिंपरी : वाल्हेकरवाडीतील घरांचे वाटप कधी?

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सर्वसामान्य नागरिकांसाठी वाल्हेकरवाडी पेठ क्रमांक 30, 32 मध्ये उभारलेल्या 792 घरांच्या वाटपाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. प्रकल्पाचे काम सुरू होऊन जवळपास साडेसात वर्षांचा कालावधी उलटला आहे. सध्या येथील सर्व सदनिका बांधून तयार आहेत. तरीही नागरिकांना घरे मिळत नसल्याने त्यांची नाराजी वाढत चालली आहे.

वाल्हेकरवाडी येथील गृहप्रकल्पाच्या कामासाठी 7 जानेवारी 2016 रोजी कामाचे आदेश देण्यात आले. कामासाठी सुरुवातीला साडेतीन वर्षांची मुदत देण्यात आली होती. 6 जुलै 2019 ला ही मुदत संपली. या गृहप्रकल्पासाठी रेरा नोंदणी पूर्ण करण्यात आली. तसेच ऑनलाइन सोडतदेखील काढण्यात आली. 38 हजार 200 चौरस मीटर जागेत 792 घरांचा हा गृहप्रकल्प साकारला आहे. प्रकल्पात 378 वन रुम किचन सदनिका तर, 414 वन बीएचके सदनिका आहेत.

प्रकल्पासाठी मुदतवाढीची हॅटि्ट्रक

वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू होते. त्यामुळे या गृहप्रकल्पासाठी तीनदा मुदतवाढ द्यावी लागली. कंत्राटदाराकडून पीएमआरडीएने दंडापोटी 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वसूल केली. त्यानंतर या गृहप्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाल्याने गृहप्रकल्पासाठी लागू केलेला दररोज 10 हजार रुपयांचा दंड रद्द करण्यात आला. या गृहप्रकल्पात अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा नलिका, मलनिस्सारण नलिका, विद्युतविषयक कामे, मैलाशुद्धीकरण केंद्र आदी सुविधांचा समावेश आहे.

हेही वाचा

पिंपरी : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार

पिंपरी : जिल्हा रुग्णालयात मिळणार मोफत उपचार

परभणी : डुघरा येथील शिंदे बंधूंचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव; पीएम कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत

Back to top button