पिंपरी : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार | पुढारी

पिंपरी : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पत्नीशी घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखवून एकाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार 26 जुलै 2022 ते मार्च 2023 या कालावधीत चाकण येथे घडला. विकी विजय केळकर (31, रा. वाकी खुर्द, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला, पत्नीपासून घटस्फोट झाल्यानंतर तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, फिर्यादी तीन महिन्यांच्या गरोदर राहिल्या. त्या वेळी फिर्यादी आणि आरोपी दोघांच्या संमतीने गर्भपात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

पिंपरी : जिल्हा रुग्णालयात मिळणार मोफत उपचार

परभणी : डुघरा येथील शिंदे बंधूंचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव; पीएम कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत

वेगळी भूमिका घेणार्‍यांचीही भूमिका बदलू शकते : खा. शरद पवार

Back to top button