अनारसेतील खसखसीचा भाव दोन हजारांवर..!

अनारसेतील खसखसीचा भाव दोन हजारांवर..!
Published on
Updated on

पिंपळे गुरव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : अधिक महिन्यात भगवान विष्णूची उपासना श्रेष्ठ मानली जाते. या महिन्यात सासू-सासरे आपली मुलगी आणि जावयाला अधिक वाण देतात. त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्त्व प्राप्त आहे. अधिक वाणमध्ये जावयाला तेहतीस अनारसे देण्याची प्रथा आहे. सध्याच्या धावपळीत विकतचे अनारसे बाजारात उपलब्ध असले तरी ते ग्राहकांना परवडणारे नाहीत. दरम्यान, अनारसेतील खसखसीचा भाव अडीच हजार प्रतिकिलो वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

असे आहेत अनारसे भाव..

मिठाई दुकानांमध्ये 270 रुपयांत 33 अनारसे
90 रुपयांत 11 अनारसे
घरगुती व्यवसाय विक्रेते अनारसे भाव
अनारसे पीठ 200 रुपये किलो
तुपातले अनारसे 650 किलो
तेलातले अनारसे 250 किलो

मनुष्यबळाची कमतरता

अनारसेमध्ये खसखस वापरली जाते. सध्या खसखसीचा भाव अडीच हजार प्रतिकिलो झाल्याने त्याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. त्याचबरोबर डोळ्यांची साथ सुरू असल्याने अनारसे बनवण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याचे महिला व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

सध्या अनारसे बनवण्याच्या पदार्थात खसखस महाग झाली आहे. त्यामुळे मी खसखस ऐवजी रव्याचा वापर केला जात आहे.

– संजीवनी कोकितकर, महिला व्यावसायिक,
नवी सांगवी

महागाईचा फटका सध्या बसत असल्याने तुपात तळळेले अनारसे बाजारात महाग झाले आहेत. खसखसचे भाव वाढले आहेत. त्यामुळे विकतचे अनारसे परवडत नाहीत.

– अनिता कुलकर्णी, नागरिक, सांगवी

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news