मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी | पुढारी

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून ५० टक्केच्या आतील आरक्षण मिळावे या मागणीकरिता दि. ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी मुंबई येथील आझाद मैदान येथे १ दिवसाचे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला मोर्चाचे समनव्यक राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, मराठा महासंघाचे अनिल ताडगे, संतोष नानवटे, वंचित बहुजन आघाडीचे प्रफुल्ल गुजर, विठ्ठल पवार, मयूर गुजर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध जाती धर्माचे लोकसंख्येचे सर्वेक्षण करुन सद्यस्थितीत देण्यात येणारे शैक्षणिक व नोकरीतील विविध प्रवर्गासाठी चे आरक्षणाची टक्केवारीचे पुर्नविलोकन करावे. गायकवाड आयोगाचे अहवालातील शिफारसीप्रमाणे महाराष्ट्र शासनाने कायदा करुन तसेच ओ.बी.सी. प्रवर्गातील जातींचे लोकसंख्येचे सर्वेक्षण करुन ५०% टक्केच्या आतील आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तातडीने करावी, ओबीसी प्रवर्गातील जातींचे फेरसर्वेक्षण, ओबीसी जातींची संख्या व लोकसंख्येची जनगणना करून सर्वेक्षणात प्रगत जातींना वगळून फक्त मागास ठरणाऱ्या जातींना लोकसंख्येच्या ५०% आरक्षण लागू करा, पीएसआय -२०१७ राज्यसेवा २०१७ आरटीओ २०१७ मधील महिलांना शासकीय सेवेत सामावून घ्या आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असून यावेळी मराठा समाजातील आमदारांचा निषेध ही नोंदवण्यातमागणी मान्य न झाल्यास पुढील दिशा ठरवण्यात येईल.

हेही वाचा

अकोले : शेतीच्या वादातून दोन गटात हाणामार्‍या

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ‘त्या’ युवकाच्या पुतळ्याचे दहन

या गावाची अजब प्रथा ! चक्क 600 जावयांनीच गावकऱ्यांना दिले धोंड्याचे जेवण

Back to top button