या गावाची अजब प्रथा ! चक्क 600 जावयांनीच गावकऱ्यांना दिले धोंड्याचे जेवण | पुढारी

या गावाची अजब प्रथा ! चक्क 600 जावयांनीच गावकऱ्यांना दिले धोंड्याचे जेवण

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील आगडगाव येथील श्रीक्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानमध्ये अधिक महिन्याच्या निमित्ताने 600 जावयांतर्फे धोंड्याचे जेवण हा महाप्रसाद रविवारी (दि. 6) देण्यात आला. या वेळी सुमारे 20 हजार भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. अधिक महिन्यात अन्नदानाला महत्त्व असते. या महिन्यात जावयांना धोंड्याचे जेवण देण्याची पद्धत आहे. तथापि, देवस्थानच्या वतीने जावयांतर्फे धोंडा जेवण असा उपक्रम राबविला. रविवारी सकाळी या सर्व जावयांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

सर्व अन्नदात्यांना पाची पोशाख व साड्या देवस्थानच्या वतीने भेट देण्यात आल्या. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. त्याबाबतचे प्रमाणपत्र डॉ. दीपक हारके यांनी आज देवस्थानला दिले. सर्व भाविकांना धोंडा, पोळी, आमटी, भात असा महाप्रसाद देण्यात आला. त्यासाठी सुमारे 200 महिला सकाळपासून गोळ्या बनविण्याचे काम करीत होत्या. गर्दीमुळे आगडगाव रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. एसटी महामंडळाच्या जादा बस सोडण्यात आल्या होत्या.

हेही वाचा :

धक्कादायक ! पिताच उठला चिमुकल्यांच्या जीवावर ; रागाच्या भरात फेकले विहिरीत

अयोध्येतील राम मंदिरासाठी ४०० किलोच्या भव्य कुलूपाची निर्मिती

Back to top button