छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ‘त्या’ युवकाच्या पुतळ्याचे दहन | पुढारी

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ‘त्या’ युवकाच्या पुतळ्याचे दहन

नगर : पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मुकुंदनगर येथील युवकाने आक्षेपार्ह वक्तव्य करून, ती ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने कापड बाजार येथे देशद्रोह्याचा पुतळा दहन केला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, विनीत पाऊलबुद्धे, प्रकाश भागानगरे, अभिजीत खोसे, संजय चोपडा, बाळासाहेब बारस्कर, सुनील त्रिंबके, विपुल शेटिया, अजिंक्य बोरकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, देशाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी शहरातील काही अपप्रवृत्तीने बेताल वक्तव्य करून जनतेच्या भावना दुखविण्याचे काम केले आहे. महापुरूषांच्या विरोधात वक्तव्य करणारे लोक थांबायला तयार नाहीत. त्यांच्यावर शासनाने देशद्रोहाचा खटला दाखल करून कडक शासन करावे. याच्या पाठीमागील टीमचा शोध घ्यावा. महापुरूषांविरुद्ध बेताल वक्तव्य करणार्‍यांच्या कुटुंबियांवर देखील कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा :

नगर : मुलीला पळवून नेणार्‍याला चोवीस तासांत पकडले

Parliament Monsoon Session : मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांची राज्यसभेत निदर्शने; राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

Back to top button