अकोले : शेतीच्या वादातून दोन गटात हाणामार्‍या | पुढारी

अकोले : शेतीच्या वादातून दोन गटात हाणामार्‍या

अकोले (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  शेतीच्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन अकोले पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल होऊन दोन्ही बाजुचे 7 जणांना अटक करुन न्यायालयाने 2 पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कुंभेफळ येथील दोन भावाच्या कुटुंबातील शेतीचे वाद असताना 4 ऑगस्ट रोजी शेतातील गिन्नी गवत काढण्याच्या कारणावरून मारामारी होऊन गळ्यातील चेन घेऊन पळाल्याच्या परस्पर विरोधी गुन्हे दाखल होऊन दोन्ही कुटुंबातील 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पहिल्या फिर्यादीत पूजा मनोहर पांडे यांनी फिर्याद दिली असून म्हटले आहे की, 4 ऑगस्ट रोजी फिर्यादीचे पती मनोहर भाऊसाहेब पांडे व सासु चंद्रभागा भाऊसाहेब पांडे हे न्यायालयीन कामासाठी अकोलेत गेले असता फिर्यादी एकटी असताना 12:30 ते 1 वा दरम्यान घराजवळ असलेल्या शेतामध्ये शुभांगी रविंद्र पांडे, सिंधुबाई कारभारी पांडे या आमच्या शेतात येवून गिन्नी गवत, ज्वारी, घेवडा उपटण्यास सुरुवात केल्याने फिर्यादिने तिथे जाऊन ‘हे क्षेत्र आमचे आहे, त्यातील आमचे पिके उपटु नका’ असे म्हणाल्याने त्याचा राग आल्याने शुभांगी पांडे, सिंधुबाई कारभारी पांडे यांनी ‘तुझ्या बापाची पेंड आहे का’? अशी शिवीगाळ करत फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दुपारी 1 वा कारभारी रामु पांडे व रविंद्र कारभारी पांडे फिर्यादीच्या घराजवळ येऊन ‘तुझ्या बापाची पेंड आहे का असे म्हणून शिवीगाळ करु लागले यावेळी फिर्यादीची मुलगी घरात रडू लागल्याने फिर्यदी घरात गेली असता रविद्र पांडे तिच्यामागे घरात जावुन तिला ढकलुन गच्ची धरून गळ्यातील पोत घेऊन पळून गेला असल्याचे फिर्यादीवरुन शुभांगी रविद्र पांडे,सिंधुंबाई कारभारी पांडे,रविद्र कारभारी पांडे, कारभारी रामु पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. दुसरी फिर्यादी शुभांगी रविंद्र पांडे हिने दिली असुन यात म्हटले आहे की, फिर्यादी व तिची सासु सिंधूबाई कारभारी पांडे घरी असताना पूजा मनोहर पांडे शेतात येऊन ‘तुम्ही लई नाटके करता’ असे म्हणून मारहाण केली. तेव्हा फिर्यादीची सासु सिधुबाई भंडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिलाही मारहाण केली.

हेही वाचा :

अहमदनगर जिल्ह्यामध्ये ई -प्रणालीद्वारे होणार पंचनामे : आयुक्त गमे

Pune Metro : पुणेकरांचा नादच खुळा! चक्क हात दाखवून थांबवली मेट्रो; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Back to top button