Pune Metro : पुणेकरांचा नादच खुळा! चक्क हात दाखवून थांबवली मेट्रो; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Pune Metro : पुणेकरांचा नादच खुळा! चक्क हात दाखवून थांबवली मेट्रो; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

पुणे : आत्तापर्यंत ग्रामीण भागात तसेच शहरामध्ये आपण सर्वानी हात दाखवून एसटी बसला थांबवली आहे. मात्र सध्या पुण्यात चर्चा आहे हात दाखवून मेट्रो थांबवलेल्या व्हिडिओची. काही दिवसापूर्वीच पुण्यातील मेट्रोचं उदघाटन झालं. जशी मेट्रो पुण्यात सुरु झाली आहे तेव्हापासून वेगवेगळ्या कारणावरून चांगलीच चर्चेत आली आहे. अशाच एका कारणामुळे मेट्रो पुन्हा ट्रोल होत आहे. पुणे मेट्रो स्टेशनवर एका प्रवाशाने चक्क मेट्रोला हात दाखवून मेट्रो थांबवलीच. आणि मेट्रोत बसून प्रवास केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काय आहे नेमकं या व्हिडिओमध्ये

सिव्हिल कोर्ट स्थानकावरुन पिंपरी-चिंचवडसाठी सुटणाऱ्या मेट्रोचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रवासी घाईघाईत सरळ प्लॅटफॉर्मवर येतो. मेट्रो निघण्याच्या तयारीत असते. त्यामुळे ती व्यक्ती मेट्रोला हात दाखवून ड्रायव्हरच्या केबीनकडे जाऊन केबीनचे दार वाजवत आहे. त्यानंतर त्याला दरवाजा उघडण्याची विनंती करत आहे. त्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडली जातात. आणि तो घाईत करून मेट्रोत बसतो आणि मेट्रो मार्गस्थ होते.

काय म्हणतात नेटकरी

पुण्यात मेट्रोचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने तर असं म्हटलंय की, पुणेकर भविष्यात हात दाखवून विमानसुद्धा थांबवून दाखवतील, पुणेकर काहीही करू शकतात… अगदी काहीही, आम्ही पुणेकर बुलेट ट्रेन हात दाखवून थांबवू शकतो… ही तर साधी मेट्रो आहे, अशा गंमतीशीर कॉमेंट्स पुणेकरांनी केल्या आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news