प्रणॉयचे विजेतेपद हुकले; फायनलमध्ये चीनच्या वांग हाँग यांगकडून पराभूत | पुढारी

प्रणॉयचे विजेतेपद हुकले; फायनलमध्ये चीनच्या वांग हाँग यांगकडून पराभूत

सिडनी : वृत्तसंस्था रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉयला पराभव पत्कारावा लागला. त्याच्याविरुद्ध चीनच्या वांग हाँग यांगने तीन गेमच्या थ्रिलरचा सामना जिंकला. प्रणॉयला या वर्षीची दुसरी बीडब्ल्यूएस 500 स्पर्धा जिंकण्याची संधी होती, पण तो जिंकू शकला नाही. जागतिक क्रमवारीत 24 व्या क्रमांकाच्या वांगकडून प्रणॉयला 9-21, 23-21, 20-22 असा पराभव पत्करावा लागला.

केरळचा राहणारा 31 वर्षीय प्रणॉयने पहिला गेम 21-9 असा गमावला. या सामन्यात वाँगचे पूर्ण वर्चस्व होते. यानंतर दुसर्‍या गेममध्ये त्याने चांगले पुनरागमन केले. दुसरा गेम थ्रिलर होता आणि प्रणॉयने तो 23-20 असा जिंकला. शेवटच्या गेममध्ये प्रणॉयने 19-14 अशी आघाडी घेतली पण इथून संपूर्ण सामना फिरला. वांगने जोरदार पुनरागमन करत स्कोअर 20-20 पर्यंत आणला. त्यानंतर पुढील दोन गुण घेत त्याने विजेतेपद पटकावले.

याआधी या भारताचा एच.एस. प्रणॉयला आणि चीनचा वांग हाँग यांग यांच्यात एकच सामना झाला होता. त्या सामन्यात प्रणॉयने तीन गेममध्ये विजय मिळवत मलेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. मात्र, यावेळी वांग हाँग यांगने एच.एस. प्रणॉयला पराभूत करत मागील पराभवाचा बदला घेतला.

उपांत्य सामन्यात प्रणॉयने प्रियांशूला केले होते पराभूत
मे महिन्यात मलेशियन मास्टर्स सुपर 500 जिंकणार्‍या 31 वर्षीय प्रणॉयने शनिवारी देशबांधव प्रियांशू राजावतचा पराभव केला होता. त्याने ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रियांशू राजावतचा 21-18, 21-12 असा पराभव केला.

Back to top button