पुणे : कव्वालीचा कार्यक्रम बंद केल्याने हॉटेलची तोडफोड

पुणे : कव्वालीचा कार्यक्रम बंद केल्याने हॉटेलची तोडफोड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमध्ये सुरू असलेला कव्वालीचा कार्यक्रम बंद केल्याने टोळक्याने हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. टोळक्याला समजावून सांगणार्‍या मालकासह अंगरक्षकांना टोळक्याने मारहाण केली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुमित चौधरी, प्रफुल्ल गोरे, अजय मोरे, फिरोज शेख, अण्णा भंडारी, निखिल वंजारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत निखिल मेदनकर (वय 32, रा. वाघोली) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुंढव्यातील वॉटर्स बार अँड किचनमध्ये कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्री दीडनंतरही कव्वालीचा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे कव्वाली कार्यक्रमाचे संयोजक निखिल यांनी कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम बंद केल्याने आरोपी चिडले. त्यांनी साथीदारांना बोलावून घेतले. टोळक्याने हॉटेलमध्ये गोंधळ घालून साहित्याची तोडफोड केली. उपाहारगृहाचे मालक तसेच अंगरक्षकांना मारहाण केली. सहायक पोलिस निरीक्षक आर. व्ही. महानोर तपास करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news