राज्यात अतिवृष्टीने 12 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान | पुढारी

राज्यात अतिवृष्टीने 12 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

किशोर बरकाले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे 17 जिल्ह्यातील सुमारे 11 लाख 96 हजार 966 हेक्टरवरील शेती आणि फळ पिकांचे क्षेत्र बाधित होऊन शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शिवाय 43 हजार 336 हेक्टरइतके क्षेत्रावरील जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्यामुळेही शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि नांदेड जिल्ह्यास बसलेला आहे.

कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार खरीप पिकांच्या नुकसानीमध्ये प्रामुख्याने भात, नाचणी, कापूस, मका, उडीद, मूग, ऊस, सोयाबीन, भुईमूग, तूर, ज्वारी, हळद, संत्रा, मोसंबी,  केळी, आंबा, फणस, नारळ, सुपारी, भाजीपाला पिकांचा समावेश आहे. जिल्हानिहाय झालेली बाधित पिकांचे क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. ः यवतमाळ 2 लाख 91 हजार 995, बुलढाणा 1 लाख 52 हजार 413, अकोला 1 लाख 37 हजार 658, अमरावती 66 हजार 848, वाशिम 45 हजार 874, नांदेड 44 हजार 780, चंद्रपूर 32 हजार 619, वर्धा 9 हजार 404, रायगड 3 हजार 710, भंडारा 2 हजार 561, नागपूर 2 हजार 14, गडचिरोली 1 हजार 613, जळगांव 1 हजार 495, पालघर 1 हजार 3, कोल्हापूर 518,  सिंधुदुर्ग 351, रत्नागिरी 110.

हेही वाचा

’झटपट वीज कनेक्शन’चा आठ हजार ग्राहकांना लाभ

वारसांची नोंद आता ऑनलाइन..! एक ऑगस्टपासून सुरू झाली कार्यवाही

ऊसतोडणी कामगारांना आरोग्य सुविधा द्या

Back to top button