जगातील सर्वात विषारी झाड | पुढारी

जगातील सर्वात विषारी झाड

न्यूयॉर्क : जगाच्या पाठीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. (poisonous tree) घटपर्णीसारख्या काही वनस्पती तर चक्क मांसाहारीही आहेत. काही वनस्पती अतिशय विषारी असतात. जगातील सर्वात विषारी झाड म्हणून ‘मँशीनील’ला ओळखले जाते. हे जगातील सर्वात घातक झाड आहे!

या झाडाचे वैज्ञानिक नाव ‘हिप्पोमेन मॅन्सिनेल्ला’ असे आहे. स्पॅनिश भाषेतील ‘मँझानिल्ला’ या शब्दापासून ‘मँशीनील’ हा शब्द आला आहे. ‘मँझानिल्ला’ या स्पॅनिश शब्दाचा अर्थ ‘छोटे सफरचंद’ असा होतो. (poisonous tree)  सफरचंदाच्या झाडासारखीच या झाडाचीही पाने व फळे असतात. त्यामुळेच त्याला ‘बीच अ‍ॅपल’ असेही म्हटले जाते. अर्थातच हे सफरचंदासारखे आरोग्याला पोषक नव्हे तर घातक फळ देणारे झाड आहे! त्यामुळे आता या झाडाला स्पॅनिश भाषेत ‘मँझानिल्ला डी ला म्यूर्ते’ असे नाव आहे. त्याचा अर्थ ‘मृत्यू देणारे छोटे सफरचंद’! हे झाड चांगले 15 मीटर म्हणजेच 49 फूट उंचीपर्यंत वाढू शकते. मुळात कॅरेबियन किनारपट्टीवर आढळणारे हे झाड अमेरिकेतील फ्लोरिडा, बहामास, मेक्सिको, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतही आढळते. या झाडाच्या सर्व भागात जहाल विष असते. त्याच्या दुधासारख्या चिकामध्ये त्वचेला हानिकारक घटक असतात. त्यामुळे पाऊस असताना या झाडाखाली उभे राहिल्यानेही धोका संभवतो. हे झाड जळत असताना त्याचा धूर डोळ्यात गेल्यावर डोळ्यांनाही इजा होऊ शकते. त्याचे फळ खाल्ल्यावर मृत्यूही संभवतो.

.हेही वाचा

मेंदूवरील ऑपरेशनवेळी ‘ती’ वाजवत होती व्हायोलिन

Back to top button