भीमाशंकर परिसराने नेसला हिरवा शालू

भीमाशंकर परिसराने नेसला हिरवा शालू
Published on
Updated on

भीमाशंकर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील भीमाशंकर, पाटण व आहुपे या पश्चिम आदिवासी भागातील परिसरात आठवडाभर जोरदार पाऊस पडत आहे. परिणामी, ओढे-नाले तसेच घोड नदी व बुब—ा नदी दुथडी भरून वाहात आहे. विविध रानफुलांनी डोंगर-टेकड्यांचा परिसर हिरवळीचा व धुक्यांच्या शालीचे निसर्गरम्य दृश्य सर्वत्र दिसत आहे. भीमाशंकर परिसरात अधूनमधून येणार्‍या श्रावण सरी आणि बोचरी थंडी ही पर्यटक व भाविकांना मोहिनी घालीत आहे.

भीमाशंकर, पाटण तसेच आहुपे परिसरात सध्या अधूनमधून येणारा जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातच दाटधुके आणि बोचरी थंडी आहे. पोखरी घाटातील गोहे पाझर तलाव भरून वाहत असून, ओढे-नालेही भरून वाहत आहेत. डोंगर-टेकड्या हिरवा शालू पांघरूण आभाळालाही लाजवेल असा नटून बसला आहे. या निसर्गाचा सहवास घेण्यासाठी सर्व जण पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटत आहे.

पश्चिम आदिवासी भागातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासह नागफणी पॉईंट, गुप्त भीमाशंकर, हनुमान तळे, मुंबई पॉईंट, डिंभे धरण, कोंढवळ धबधबा, आहुपे आदींसह भीमाशंकर अभयारण्यात फिरण्यासाठी मुंबई-पुणे व इतर राज्यांतून पावसाळी पर्यटन आणि देवदर्शन असा दुहेरी लाभ घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत आहेत. परिसरामध्ये पावसाळ्यात दर शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक व पर्यटक येतात. येथे येणा-या पर्यटकांना पाटण, कुशिरे, माळीण, आहुपे परिसरातील धबधबे, निसर्गरम्य दृश्य टिपता येतात.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news