पिंपरी : आता स्मार्ट सिटीच्या साहित्यावरही चोरट्यांचा डल्ला

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. निगडी, सेक्टर क्रमांक 22 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीजवळील सीसीटीव्ही कॅमेर्यांचा बॉक्स, बॅटरी व इलेक्ट्रिकचे साहित्य चोरट्यांनी चोरले आहे.
त्यामुळे तेथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली आहे. चिकन चौकात घडलेला हा चोरीचा प्रकार गुरुवारी (दि.20) सकाळी उघडकीस आला. त्यासंदर्भात माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांना कळविले. त्यानंतर संबंधित अधिकार्यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
हेही वाचा
अरे व्वा..! पवना धरण निम्मे भरले