पुण्यातील खळबळजनक घटना : दोन सख्या भावांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार | पुढारी

पुण्यातील खळबळजनक घटना : दोन सख्या भावांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

उरुळी कांचन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर पंधरा दिवसांहून जास्त काळ दोघा सख्ख्या भावांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे हा प्रकार घडला असून, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी इरफान शेख (मुजावर)आणि आयुब शेख (मुजावर) या भावांना अटक केली आहे. मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास पीडित मुलीची आई लघुशंकेसाठी बाहेर आली, त्या वेळी आयुब मुजावर हा मुलीच्या अभ्यासाच्या खोलीच्या बाहेर उभा असलेला त्यांना दिसला त्यांनी खोलीत पाहिले असता खोलीत इरफान मुजावर हा होता.

मुलीच्या आईला पाहिल्यावर ते पळून गेले. आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन हे दोघे गेल्या पंधरा दिवसांपासून या अल्पवयीन मुलीवर वारंवार आळीपाळीने बलात्कार करत होते. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, हे दोघेही आई-वडिलांना ठार मारतील या भीतीने मुलगी हे अत्याचार सहन करत होती. मंगळवारी रात्रीही या दोघांनी आळीपाळीने मुलीवर बलात्कार केला असल्याचे पीडित मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. इरफान आणि आयुब शेख या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

महापुरुषांची बदनामी

या दोन्ही आरोपींनी यापूर्वी सोशल मीडियावर महापुरुषांची बदनामी केली होती, त्या प्रकरणातही त्यांच्यावर विशेष गंभीर कारवाई झाली नव्हती, प्रथम त्यांना बाँडवर सोडले नंतर पंधरा दिवसांनी गुन्हा नोंदविला असे घडल्याने सोकावलेल्या आरोपींनी हा दुसरा गुन्हा केला आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर संशय

आरोपींनी चाकूचा धाक दाखवून मुलीच्या मनात दहशत निर्माण करून तिच्यावर बलात्कार केला, असे पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांना सांगितले. परंतु पोलिसांनी फिर्यादीमध्ये तसा उल्लेख केलेला नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.

हेही वाचा

छगन भुजबळ धमकी प्रकरण : आरोपीची अटक बेकायदा

पुणे : रस्ता खोदाईसाठी परवानगी बंधनकारकच

पुणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा; महापालिकेचे आवाहन

Back to top button