पुणे : गंज पेठेतील धोकादायक फांद्या छाटण्याची मागणी | पुढारी

पुणे : गंज पेठेतील धोकादायक फांद्या छाटण्याची मागणी

भवानी पेठ(पुणे) : गंज पेठ पेठेतील मध्यवस्तीतील विस्तारलेल्या वृक्षांच्या फांद्या घरांवर आणि विद्युत तारांना अडथळा ठरत आहेत. पावसाळ्यात दुर्घटना घडू नये यासाठी फांद्यांची त्वरित छाटणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. महात्मा फुले वाडा, मीठा पल्ली वाडा, त्रिशूल मित्र मंडळ, विकास मित्र मंडळ, समता भूमी अभ्यासिका, डायमंड मित्र मंडळ आदी परिसरात धोकादायक वृक्ष आहेत. येथील वृक्ष खूप वर्षे जुने असल्याने त्यांचा घेर ही मोठा आहे.

यात पिंपळ, वड अशा वृक्षांचा समावेश आहे. अनेक फांद्या सीमा भिंतीवर आहेत. त्याचप्रमाणे या फांद्या घरांवर आल्याने नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. भिंतीना भेगा पडल्या आहेत तर विद्युत तारांवर फांद्या लोंबकळताना दिसत आहेत. शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिक देवा देवकुळे यांनी दै. मपुढारीफशी बोलताना व्यक्त केली.

वीजवितरण कंपनीने एकदा विद्युतवाहिन्या टाकल्यानंतर पुन्हा त्या भूमिगत करण्यात येत नाहीत. त्यासाठी महापालिकेकडून निधी उपलब्ध होणे गरजेचे असते. त्याबाबतीत स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे त्याप्रकारे मागणी करणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाला याबाबतीत लागणारे संंपूर्ण साहाय्य आम्ही करू.

– शिवलिंग भोरे,
शाखा अभियंता, महावितरण

गेल्या पाच वर्षांपासून आमच्या वस्तीवरील खांब आहे तसाच आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. महावितरणकडून वीजबिल वेळेवर घेतले जाते, त्याप्रमाणे या तारांची सोय करून विद्युतवाहिनी भूमिगत करावी, ही आमची मागणी आहे. पावसाळ्यात तर या तारांमुळे जीव मुठीत धरूनच वागावे लागते.

– संतोष धुमाळ. स्थानिक नागरिक

हेही वाचा

कोल्हापूर: तरुणाची फायनान्स कार्यालयात तोडफोड

पोलिसांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून अट्टल गुन्हेगाराची हत्या

पुणे : पाच वर्षांत पालिकेचे 22 जण एसीबीच्या जाळ्यात

Back to top button