पुणे : एसएनडीटीत चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम

पुणे : एसएनडीटीत चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) देशभरातील 42 संस्थांना चार वर्षांचा एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (बी. ए. – बी. एड.) राबवण्यास मान्यता दिली आहे. त्यात राज्यातील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) पुणे येथील शिक्षण संकुलातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा समावेश आहे. एसएनडीटी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नलिनी पाटील यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये शिक्षक प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी 2030 पर्यंत शिक्षक प्रशिक्षण एकात्मिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर एकात्मिक अभ्यासक्रम राबवण्यासाठी देशभरातील शिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यात देशभरातील आयआयटी, केंद्रीय विद्यापीठे, विद्यापीठे मिळून 42 संस्थांची निवड करण्यात आली. एसएनडीटी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात माध्यमिक स्तरावरील बीए-बी.एड अभ्यासक्रमासाठी बारावीत किमान 50 टक्के गुण असलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश घेता येईल.

एकूण 50 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. या अभ्यासक्रमाची संगणकावर आधारित प्रवेश परीक्षा (सीबीटी) राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणामार्फत घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या अर्जांसाठी अंतिम मुदत 19 जुलै आहे. डॉ. पाटील म्हणाल्या, की एकात्मिक अभ्यासक्रम दुहेरी पदवी स्वरूपाचा आहे. त्यात कला शाखेची आणि शिक्षणशास्त्राची पदवी मिळणार आहे. तसेच मल्टिपल एन्ट्री, मल्टिपल एक्झिट या अभ्यासक्रमाला लागू आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news