संगमनेरात कांद्याला पंधराशे ते अठराशेंचा भाव

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीत शुक्रवार (दि. 7) बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डात झालेल्या कांदा लिलावात एकुण 26 हजार 444 गोण्या कांद्याची आवक झाली. लिलावात आलेल्या चांगल्या दर्जाच्या एक नं. कांद्याला 1500 ते 1801 रुपये भाव मिळाला. शेतकर्यांनी आपला शेतीमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी केले. सध्या कांद्यासह इतर पिकांची आवक कमी असून पावसाने तालुक्यात पाठ फिरवली असल्याने शेतकरी चिंचाग्रस्त आहे. यामुळे भाजीपालासह पिके धोक्यात असून सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. तरीही शेतकरी उपलब्ध पाण्यावर शेती करून पिके वाचवत आहे. कांद्याची आवक कमीच असून शुक्रवारी संगमनेर बाजार समितीत 26 हजार 444 गोण्यांची आवक झाली आहे. एक नंबर कांद्याला 1500 ते 1800 रुपये भाव मिळाला.
तर दोन नं. कांद्याला 1000 ते 1400 रुपये, तीन नं. कांद्याला 500 ते 900 रुपये इतका भाव मिळाला. तसेच गोल्टी कांद्याच्या भावातही प्रतिक्विंटल 200 रुपयांची वाढ होवुन 400 ते 800 रुपये भावाने विकला गेला आहे. तसेच यार्डमध्ये टोमॅटो या शेतमालाची एकुण 14200 क्रेटस आवक होवुन 1400 रु. प्रति क्रेटस बाजारभाव मिळाला. डाळिंब या शेतमालाची एकुण 1672 क्रेटस आवक होवुन 1 नं. डाळिंब मालास प्रतिकिलो रु.175 ते रु.250 व 2 नं. मालास रु.121 ते रु.151 तर 3 नंबर मालास रु.100 ते रु.111 पर्यंत बाजारभाव मिळाला आहे. बाजार समिती शेतकर्यांच्या पाठीशी उभी असल्याचे बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व संचालक मंडळ, सचिव सतिषराव गुंजाळ यांनी सांगितले.
हे ही वाचा :
Ashadhi wari 2023 : पुणे जिल्ह्यात पालखीचे स्वागत; माउलींच्या पादुकांना परतीच्या प्रवासात निरा स्नान