श्रीरामपूरच्या तरूणाचा पुणतांब्यात निर्घृण खून | पुढारी

श्रीरामपूरच्या तरूणाचा पुणतांब्यात निर्घृण खून

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा :  श्रीरामपूर येथील गोंधवणी परिसरात राहणार्‍या तरूणाचा काही अज्ञातांनी धारदार शस्त्राने पुणतांबा- श्रीरामपूर रस्त्यावर खून केला. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुधीर अशोक कांदे (वय 35, रा. गोंधवणी, भैरवनाथ नगर, फरगडे वस्ती) असे या तरूणाचे नाव आहे.
याबाबत राहाता पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, पुणतांबा- श्रीरामपूर रस्त्यावरील सम्राट धाब्याजवळील तोडमल वस्ती जवळ या तरूणाचा धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हे वार वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर मारेकरी पसार झालेले आहेत.
याबाबत नवनाथ दादासाहेब चौधरी (गोंधवणी) यांनी राहता पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

पुणतांबा- श्रीरामपूर रस्त्यावर ज्या ठिकाणी घटना घडली. त्या ठिकाणी शिर्डी पोलिस उपविभागीय अधिकारी यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ पुढील तपास करीत आहे अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून पुणतांबा-श्रीरामपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. सध्या सर्वच ठिकाणी रात्रीच्यावेळी सर्रासपाणे चोरटी वाहतुक होत आहे. त्यामुळे गुन्हगारीचे प्रकारही वाढलेले आहे. या तरूणाचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला? हे अद्याप कळालेले नाही.

हे ही वाचा :

राज्यातील जि. प. शाळांमध्ये करणार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुहेरी वाहतुकीचे आदेश रद्द

Back to top button