पॉलिटेक्निक प्रवेशासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ | पुढारी

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सुरू असलेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 7 जुलै होती. परंतु विद्यार्थी तसेच पालकांच्या मागणीनुसार आता अंतिम मुदत वाढण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज करण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, पुढील तीन फेर्‍यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या अभ्यासक्रमासाठी राज्यभरात एक लाखाहून अधिक जागा आहेत. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्याअगोदर सुरू झालेल्या प्रवेशप्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत 7 जुलैपर्यंत होती. ही मुदत संपल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना प्रथम तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

त्यानंतर ऑनलाइन अर्ज करीत आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड कराव्यात. आतापर्यंत एक लाख 50 हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळण्यास होणारा उशीर विचारात घेऊन कागदपत्रे सादर करण्यास आता दुसर्‍या फेरीपर्यंत संधी देण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली.

हेही वाचा

’ती’च्या सुरक्षेसाठी ’सद् रक्षणाय खलनिग्रहणाय’; आपापल्या हद्दीत पोलिसकाका, पोलिसदीदी योजना सुरू होणार

पुणे : पोलिस आयुक्त, सह आयुक्त थेट फिल्डवर

पुणे : पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने रखडली कारवाई

Back to top button