पुणे : ‘शासन आपल्या दारी’साठी रखडले विविध दाखले? | पुढारी

पुणे : ‘शासन आपल्या दारी’साठी रखडले विविध दाखले?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीचा परिणाम प्रशासकीय कामकाजांवर होत आहे. सामान्य नागरिकांना त्याचा थेट फटका बसत आहे. परिणामी, अनेक दाखले रखडले आहेत. जेजुरी येथे जुलैच्या सुरुवातीला होणार्‍या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला ‘तारीख पे तारीख’ देण्यात आली. या कार्यक्रमात दाखले वितरणासाठी ते रखडल्याची चर्चा आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देऊन थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.

त्यामुळे नेते, मंत्र्यांचे दौरे रद्द झाल्याने शासन आपल्या दारी अभियानाचे नियोजन कोलमडले. परिणामी, ज्या दिवशी कार्यक्रम घेण्यात येणार त्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे दाखले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत देण्यात येणार असल्याने तेदेखील थांबविण्यात आले. परंतु, राजकीय उलथापालथ झाल्याने सर्व दौरे रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे, सामान्य नागरिकांचे दाखले प्रलंबितच असल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर आहे.

जेजुरी येथे शासन आपल्या दारी हा उपक्रम 3 जुलै रोजी होणार होता. त्यामुळे सर्व दाखले, निकाल राखून ठेवले होते. मात्र, दौरे रद्द झाल्याने सर्व प्रक्रिया रखडल्याने विलंब झाला. त्यानंतर 8 जुलै तारीख निश्चित केली असताना ती रद्द करून आता 13 जुलै रोजी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करून देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. महारोजगार मेळाव्याद्वारे विविध पदांकरिता पात्र उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा

आतापर्यंत 4 कोटींहून अधिक सात-बारा उतारे डाऊनलोड

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

’ती’च्या सुरक्षेसाठी ’सद् रक्षणाय खलनिग्रहणाय’; आपापल्या हद्दीत पोलिसकाका, पोलिसदीदी योजना सुरू होणार

Back to top button