संघर्षाला घाबरतंय कोण ? रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत | पुढारी

संघर्षाला घाबरतंय कोण ? रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत

पुणे : अजित पवार व इतर काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रविवारी शपथ घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘वाट आहे संघर्षाची… म्हणून थांबणार कोण? सह्याद्रीसोबत आहे महाराष्ट्र सारा…’ अशा आशयाचा एक व्हिडीओ रोहित पवारांनी ट्विट केला आहे.

आमदार रोहित पवारांनी या व्हिडीओतून शरद पवारांच्या संघर्षाची कथा शेअर केली असून, तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लढणं आणि जिंकणं, हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच आहे, असंही त्यांनी म्हटलंय. ‘वाट आहे संघर्षाची… म्हणून थांबणार कोण? सह्याद्रीसोबत आहे महाराष्ट्र सारा, दर्‍याखोर्‍यातून अन् गावशिवारातून वाहणारा वारा… मग संघर्षाला घाबरतंय कोण? लढणं आणि जिंकणं, हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच…” असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा

पुणे जिल्ह्यात कार्यकर्ते झालेत हतबल

पवारांच्या वादात कार्यकर्ते सैरभैर; कोणते पवार? पुण्यातही विवंचना !

कोणता झेंडा घेऊ हाती; पवारांच्या वादात कार्यकर्ते सैरभैर

Back to top button