कोणता झेंडा घेऊ हाती; पवारांच्या वादात कार्यकर्ते सैरभैर

कोणता झेंडा घेऊ हाती; पवारांच्या वादात कार्यकर्ते सैरभैर

पुणे : अजित पवार यांनी बंड केले. उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले, दिलीप वळसे पाटील मंत्री झाले. परंतु, ज्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत, त्या जिल्ह्यातील स्थानिक नेते, कार्यकर्ते यांना मात्र रविवारी काहीच सुचत नव्हते. 'आपण कोणाच्या पाठीशी राहावे? काय करावे? आज एक भूमिका घेतली आणि उद्या दोन्ही पवार एकत्र आले, तर काय होईल?' या चिंतेने ग्रासलेले हे सर्व जण सैरभैर झालेले दिसत होते. चांगल्या मातब्बरांना विचारले तरी ते 'आता काय बोलणार? आपले एक-दोन दिवस गप्पच राहू,' अशी प्रतिक्रिया देत होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news