शरद पवारांचे आज सातार्‍यात डॅमेज कंट्रोल

शरद पवारांचे आज सातार्‍यात डॅमेज कंट्रोल
Published on: 
Updated on: 

कराड; पुढारी वृत्त्तसेवा : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सोमवारी सकाळी कराडला येत आहेत. त्यांच्या दौर्‍याची मोठी उत्सुकता कार्यकर्त्यांना असून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सातार्‍यातही मातंग परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.

शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी बैठकीसाठी सातारा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. सोमवारी सकाळी दहा वाजता ते कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीनंतर ते पहिल्यांदाच कराडला येत असल्याने मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे.

दरम्यान, खा. श्रीनिवास पाटील व आ. बाळासाहेब पाटील यांनी रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर एकत्रित बैठक घेत सोमवारच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. समाधी स्थळावर शरद पवार यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते जमा होतील असे नियोजन राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news