सावधान : सापांच्या प्रजननाचा काळ; बूट, मुलांची दप्तरे, खेळण्याच्या जागा, घराच्या परिसरावर लक्ष ठेवा | पुढारी

सावधान : सापांच्या प्रजननाचा काळ; बूट, मुलांची दप्तरे, खेळण्याच्या जागा, घराच्या परिसरावर लक्ष ठेवा

कोरेगाव भीमा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सापांच्या प्रजननाचा देखील काळ आहे. या काळात घोणस व नाग या विषारी सापांची पिले घराच्या आजूबाजूला येत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले आहे. सध्या सापांच्या प्रजननाचा काळ सुरू झालेला असताना सापांच्या पिलांचा जन्म झालेला असून, पाण्यामुळे सापांना निवारा नसल्यामुळे सापांसह सापाची पिले निवार्‍याच्या शोधात घराच्या आजूबाजूला येत असतात. परिसरात आल्यानंतर सापांची पिले घराबाहेरील जागा तसेच घराबाहेरील बुटांचा देखील आसरा घेतात.

मात्र, नागरिक घराबाहेर पडताना बुटांचे निरीक्षण न करताच बूट पायात घालतात. मात्र, त्यामध्ये सापाचे पिलू बसलेले असल्यास सर्पदंशाची दुर्घटना देखील होऊ शकते. यापूर्वी अनेक ठिकाणी कित्येकदा नागरिकांच्या तसेच लहान मुलांच्या बुटांमध्ये विषारी सापाची पिले बसल्याचे निदर्शनास आलेली आहेत, तर मुले घराच्या ओट्यावर अभ्यास करीत असल्यास तेथील सतरंजी, दप्तर यांचा देखील सापांची पिले आधार घेतात.

लहान मुले खेळत असलेल्या ठिकाणी कित्येकदा सापांची पिले निदर्शनास येतात, त्यामुळे नागरिकांनी या काळामध्ये सापांपासून होणार्‍या दुर्घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले आहे.

हेही वाचा

कृषी दिन विशेष : गोवा राज्यात १३,३०० हेक्टर जमीन पडीक

कोल्हापूर-शिर्डी मार्गावर डिसेंबरपासून विमानसेवा

सांगली : महापालिकेचे अग्निशमन अधिकारी पवार निलंबित

Back to top button