सांगली : महापालिकेचे अग्निशमन अधिकारी पवार निलंबित | पुढारी

सांगली : महापालिकेचे अग्निशमन अधिकारी पवार निलंबित

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांना शुक्रवारी रात्री निलंबित करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल प्राप्त होताच आयुक्त सुनील पवार यांनी ही कारवाई केली. उपअग्निशमन अधिकारी (मिरज) सुनील माळी यांच्याकडे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

फायर सिस्टिम बसविल्याच्या कामाच्या अंतिम दाखल्यासाठी 1.25 लाख रुपयांची लाच स्वीकारताना प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार याना रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 27 जून रोजी सापळा रचला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती. त्यांना दोन पोलिस कोठडी मिळाली होती. शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना दुपारी जिल्हा न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्तता केली.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महापालिकेला शुक्रवारी ई-मेलद्वारे अटकेसंदर्भातील अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपायुक्त राहुल रोकडे यांना दिला. शुक्रवारी रात्री प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांना निलंबित करण्यात आले.

Back to top button