कोल्हापूर-शिर्डी मार्गावर डिसेंबरपासून विमानसेवा | पुढारी

कोल्हापूर-शिर्डी मार्गावर डिसेंबरपासून विमानसेवा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विमानतळांचा विकास वेगाने होत आहे. यामुळे तीर्थक्षेत्रे हवाई मार्गाने जोडली जातील, तशी चांगली संधी असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. कोल्हापूर-शिर्डी या मार्गावर डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

राज्यातील विमानतळांचा विकास सुरू आहे. कोल्हापूर, नाशिक, नांदेड विमानतळ सुरू आहेत. सोलापूर, उस्मानाबाद, लातूर विमानतळाची कामे सुरू आहेत. यामुळे राज्यातील तीर्थक्षेत्रे हवाई मार्गाने जोडली जातील, असे विखे-पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर-शिर्डी मार्गावर विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरातून ‘वंदे भारत’ सुरू करण्यासाठी पाठपुरावा करा, अशी सूचनाही विखे-पाटील यांनी केली. त्यावर कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-तिरुपती या मार्गावर ‘वंदे भारत’ सुरू करावी, अशी मागणी केली असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले.

Back to top button