तळेगाव दाभाडे : पावसाच्या रिपरिपीने धबधबे खळाळू लागले | पुढारी

तळेगाव दाभाडे : पावसाच्या रिपरिपीने धबधबे खळाळू लागले

तळेगाव दाभाडे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेली चार-पाच दिवस पडत असलेल्या पावसामुळे मावळ तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगरांवरून धबधबे वाहू लागले आहेत. सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये वसलेला मावळ तालुका. या तालुक्यात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होत असते. या डोंगरी पट्ट्यात हजारो धबधबे निर्माण होतात. धबधबे पाहण्यासाठी व वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी मावळ तालुक्याच्या विविध भागांत पर्यटक येत असतात.

पर्यटनास चालना मिळण्यासाठी पुढाकार

पावसाचा सध्या जोर कमी असल्याने डोंगर माथ्यावरून वाहणार्‍या धबधब्यांना पाणी कमी प्रमाणात आहे; मात्र पावसाचा जोर वाढल्यानंतर फेसाळलेले धबधबे पाहून पर्यटकांचे मन सुखावून जाते. सध्या या भागातील युवा उद्योजक विविध व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत.

या भागात पर्यटनास सलग्न व्यवसाय करण्यासाठी अनेक युवक पुढे येत असून तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांचे सहकार्य व मार्गदर्शनाखाली पर्यटनस्थळी व्यवसाय उभारत आहेत. तसेच पर्यटनाला चालना मिळावी म्हणून तालुक्यातील पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी रस्ता रुंदीकरणाबरोबर इतर सुविधा आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जात असल्याचे व्यावसायिक युवक सांगत आहेत.

हेही वाचा

लोणावळ्यातील दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक वाहतूक समस्या सुटणार

पुणे : पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यात पाऊस ओसरला

कोपरगाव : ‘गणेश’च्या अध्यक्षपदी लहारे; दंडवते उपाध्यक्ष

Back to top button