कोपरगाव : ‘गणेश’च्या अध्यक्षपदी लहारे; दंडवते उपाध्यक्ष

कोपरगाव : ‘गणेश’च्या अध्यक्षपदी लहारे; दंडवते उपाध्यक्ष
Published on
Updated on

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : श्री गणेश सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी सुधीर वसंतराव लहारे तर उपाध्यक्षपदी विजय भानुदास दंडवते यांची एकमताने निवड प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या उपस्थितीत झाली. या निवडीवेळी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह संचालक, सभासद, नागरिक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. थोरात म्हणाले, गणेश कारखाना निवडणूक मोठ्या मताधिक्याने विश्वास दाखवला. आगामी काळात विवेक कोल्हे आणि आमच्यावर एक प्रकारची मोठी जबाबदारी दिली आहे. याची आम्हाला जाणीव आहे.

हा कारखाना धार्मिक स्थळाप्रमाणे आमच्यासाठी पवित्र आणि पूजनीय आहे, असे आम्ही मानतो. त्यामुळे कोण- कोणत्या राजकीय पक्षाचे हे न बघता सभासद आणि शेतकरी हेच सर्वस्व मानून या कारखान्याची घडी बसवण्याची आमची कार्यपद्धती असेल. शिस्त, नियम, ताळेबंद, एकोपा या आधारावर नवीन संचालक मंडळ काम करेल, असा विश्वास आहे.

विवेक कोल्हे पूर्वनियोजित कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांची आठवण काढताना आ. थोरात यांनी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्याकडे विवेक कोल्हे यांना आजची एकच सुट्टी परत नाही, असा विनोद करत आगामी काळातील उज्वल कारभाराचे ऐक्य अधोरेखित केले.
नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा देताना स्नेहलता कोल्हे यांनी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त केले. कार्यकर्ता कसा असावा तर साहेबांनी घडवला तसा असावा, असे त्या म्हणाल्या.

विवेक कोल्हे यांनी अतिशय कमी वयात एक धाडसी निर्णय घेतला. त्या निर्णयाला साथ देऊन आशीर्वाद देण्याचे काम सर्वांनी केले, त्यांचे आभार मानले. राजकीय पक्ष विसरून सर्वजण केवळ गणेश कारखाना आणि परिसर याचा विकास व्हावा, या भावनेने सर्वजण एकत्र आले. यात खरा सहकार आहे, असे मी मानते. आगामी काळात कारखाना उत्तम रीतीने चालविण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारखाना कामकाजात सरकार म्हणून आम्ही पाठीशी आहोत, असे सांगितले असल्याचे कोल्हे म्हणाल्या.

याप्रसंगी शिवाजीराव कोते, सुधीर म्हस्के, धनंजय जाधव, संजय शेळके, चंद्रभान धनवटे, चंद्रभान गुंजाळ, भागवत चोळके, सर्जेराव जाधव, अशोकराव दंडवते, महेंद्र शेळके, दिलीप क्षीरसागर, भाऊसाहेब थेटे, संजय सरोदे, रावसाहेब बोठे, डॉ. वसंत लभडे, श्रीकांत मापारी, सुहास वहाडणे, उपस्थित होते.

विवेक कोल्हेंनी कामकाजात लक्ष घालावे

आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे विवेक कोल्हे आजच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यावर बोलताना ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितले की, विवेक कोल्हे यांना ही शेवटची सवलत आहे. यापुढे त्यांना सवलत मिळणार नाही. कारखान्याच्या नियमित कामकाजात त्यांना लक्ष घालावे लागेल. दरम्यान गणेश कारखान्यामध्ये विवेक कोल्हे यांनी तज्ज्ञ संचालक म्हणून कामकाजात सहभाग घ्यावा, असे सूतोवाच बाळासाहेब थोरात यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news