लोणावळ्यातील दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक वाहतूक समस्या सुटणार

लोणावळ्यातील दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक वाहतूक समस्या सुटणार

लोणावळा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरात पावसाळ्यात दरवर्षी होणारी वाहतूककोंडी व ती सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात शासकीय अधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने वाहतूककोंडी होण्याची ठिकाणे, त्याची कारणे आणि त्यावर शक्य होईल, अशा प्रकारच्या उपाययोजनासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, मुख्याधिकारी पंडित पाटील, पिंपरी- चिंचवड प्रादेशिक कार्यालयातील आरटीओ अधिकारी, वनविभागाचे अधिकारी सागर चुटके, आयआरबीचे अधिकारी पी. के. शिंदे, लोणावळा नगर परिषदेचे अधिकारी वैशाली मठपती, मम्हाणे आदी उपस्थित होते.

पावसाळ्यात तसेच शनिवार, रविवार व सुट्यांच्या काळात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कुमार चौक, मिनू गॅरेज चौक येथे सिंग्नल यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर परिषदेकडून याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली असून येत्या पंधरा दिवसांत कामाला सुरुवात होणार असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले.

हायवेवर काही प्रमाणात बॅरिकेट्स लावत वाहतूक नियंत्रण करणे, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे. भुशी धरण मार्गावर सहारा पूल, कुमार पोलिस चौकी, रायवूड पोलिस चौकी याठिकाणी पीए सिस्टम लावत त्याद्वारे सूचना देणे आदी निर्णय बैठकीत घेण्यात आले आहेत. दर शनिवार, रविवार होत असलेली वाहतूककोंडी व त्यामधून सर्वसामान्य नागरिकांना व पर्यटकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी नागरिक व व्यावसायिक यांनी सहकार्य केल्यास निश्चितच काही प्रमाणात का होईना, पण वाहतूककोंडी समस्या सोडविण्यात यश येईल, असा आशावाद सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी व्यक्त केला.

विविध उपाययोजना आखणार…

मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी पुण्याकडे सरळ जाणारी वाहने अंबरवाडी फाटा येथून वळवून तुंगार्लीमार्गे नारायणी धाम पोलिस चौकी येथून बाहेर काढणे, भुशी धरणाकडून येणारी वाहने रायवुड पोलिस चौकी येथून जुना खंडाळामार्गे बाहेर काढणे, जागोजागी दिशादर्शक फलक लावणे, मोठ्या बसेसला भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावर बंदी घालणे, शहरातील वेगवेगळ्या रस्त्यावर सर्रास सुरू करण्यात आलेले रिक्षा व टॅक्सी थांब्याचा सर्वे करून त्याची अधिकृती व मर्यादा तपासून जागेच्या उपलब्धतेनुसार स्टॅन्डची मर्यादा निश्चित करून देणे या विषयावर चर्चा झाली.

विशेषतः पर्यटकांसह स्थानिकांकडूनदेखील जादा पैसे रिक्षाचालक आकारत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने भाडे निश्चिती करून देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. अवैध वाहतुकीच्या अंतर्गत कारवाई व दंड आकारणी करण्यासाठी लोणावळा पोलिस व आरटीओ यांनी संयुक्त कारवाई मोहीम हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news