पुणे : पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यात पाऊस ओसरला

पुणे : पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यात पाऊस ओसरला

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यात बुधवारी (दि. 28) सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, मंगळवारी पडलेल्या संततधारेमुळे गेल्या 24 तासांत चार धरणांत मिळून 0.25 टीएमसी पाण्याची भर पडली आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 4.50 टीएमसी म्हणजे 15.42 टक्के इतका साठा झाला होता.

बुधवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंतच्या दिवसभरात टेमघर येथे सर्वांत अधिक 30, तर वरसगाव येथे 19, पानशेत येथे 20 व खडकवासला येथे फक्त 6 मिलिमीटर पाऊस पडला. मंगळवारी (27) सायंकाळी पाच ते आज सकाळी सहापर्यंत वरसगाव येथे 97, पानशेत येथे 96, टेमघर येथे 80 व खडकवासला येथे 31 मिलिमीटर पाऊस पडला होता. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर ओसरला आहे. असे असले तरी रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत, वरसगाव खोर्‍यात पावसाळी वातावरण कायम आहे. अधुनमधून सरी कोसळत आहेत.

दापसरे, टेकपोळे, शिरकोली खोर्‍यातील डोंगरकडे, ओढ्या-नाल्यांतून पाण्याचे प्रवाह सुरू झाले आहेत. संततधार सुरू झाली. सिंहगड, खडकवासला भागांत मात्र तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. अधूनमधून पावसाची उघडीप सुरू आहे.

गतवर्षीपेक्षा धरणसाखळीत जादा पाणी
गेल्या वर्षी आजच्या दिवशी 28 जुलै 2022 रोजी साखळीत 2.71 टीएमसी म्हणजे 9.30 टक्के पाणी शिल्लक होते.

अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याने चार ते पाच दिवस पश्चिम घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत रायगड जिल्ह्यालगतच्या घाटमाथ्यावर संततधार सुरू होती. मात्र, बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला. जोरदार वारे वाहू लागल्याने पावसाचे ढग विरळ झाले आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने सकाळ धो-धो वाहणार्‍या ओढ्या-नाल्यांचे प्रवाह मंदावले आहेत. त्यामुळे धरणसाठ्यातील वाढ मंदावली.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news