पुणे: कामशेतमध्ये आढळला आठ फूटी अजगर

पुणे: कामशेतमध्ये आढळला आठ फूटी अजगर

कामशेत (पुणे): कामशेत येथे कुजगाव रोडवर एका घराजवळ मंगळवार २७ जून रोजी आठ फुट लांबीचा अजगर आढळला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्यांना या बाबत माहिती मिळाल्यानंतर सोन्या वाडेकर, तेजस शिंदे, कार्तिक गायकवाड यांनी अजगरास व्यवस्थित काळजी घेत पकडले. त्यानंतर या बाबतची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे यांना दिली.

प्रमोद ओव्हाळ, दक्ष काटकर , यश बच्चे, शुंभम आंद्रे, ओमकार कडू, जिगर सोलंकी यांनी सापाची प्राथमिक तपासणी करून वडगाव वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या निरक्षणाखाली त्याला निसर्गाच्या अधिवासात सोडून दिले. सध्या पावसाळा असल्यामुळे भरपूर साप बाहेर पडतात, तरी नागरिकांनी घरात व काम करण्याच्या ठिकाणी दक्षता घेणे आवश्यक आहे. साप आढळून आल्यास त्यास न मारता त्याला स्वतःहून जाऊ द्या किंवा वन्यजीव रक्षकांना, प्राणीमित्र किंवा वनविभागाला कळवा, असे वन्यजीव रक्षक संस्थेचे निलेश गराडे, अनिल आंद्रे यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news