पुणे : ‘आयुष्मान भारत’चे कार्ड केवळ 32 टक्के कुटुंबांनाच!

पुणे : ‘आयुष्मान भारत’चे कार्ड  केवळ 32 टक्के कुटुंबांनाच!
पुणे : पुढारी वृत्तसेवा :  आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे कार्ड तयार करणे आणि वाटप करण्यात पुणे जिल्हा पिछाडीवर पडला आहे. केवळ 32 टक्के कुटुंबांना हे कार्ड वाटप झाले आहे. काम असमाधानकारक झाल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पुढील सात दिवसांतच शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश सीईओ आयुष प्रसाद यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. योजनेतील पाच लाख 57 हजार 81 लाभार्थ्यांपैकी केवळ एक लाख 78 हजार 547 जणांना कार्ड वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण केवळ 32.05 टक्के एवढे आहे.
यात वाढ करण्यासाठी धडक मोहीम राबवून शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जनआरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकारपुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशनअंतर्गत 2018 मध्ये सुरू करण्यात आली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकार गरजू कुटुंबांना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येतो.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात राबवली जात आहे. गावपातळीवर योजनेचे कार्ड तयार करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश प्रसाद यांनी दिले आहेत. कार्ड न मिळालेल्या लाभार्थ्यांना एकत्रित करून आवश्यक कागदपत्रे (आधार, शिधापत्रिका, मोबाईल क्रमांक) घेऊन शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरांतर्गत पुढील सात दिवसांत 100 टक्के लाभार्थ्यांना कार्ड वाटप करावेत आणि अहवाल सादर करावा, असेही आदेश आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.काम असमाधानकारक; कार्डसाठी धडक मोहीम

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news