पुणे : जलवाहिन्या चक्क गटारीतून ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता | पुढारी

पुणे : जलवाहिन्या चक्क गटारीतून ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता

खडकी : पुढारी वृत्तसेवा :  खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अनेक ठिकाणी जलवाहिन्या चक्क गटारीतून गेल्या आहेत. यामुळे जलवाहिन्यांचे पाणी दुषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या दुषित पाण्यामुळे होणार्‍या आजारांचे रूग्ण वाढत असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. बोर्ड प्रशासनाने याबाबत योग्या त्या उपाययोजना करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

अनेक वार्डात जलवाहिन्या गटारीतून गेल्या आहेत. मुख्य जलवाहिनीतून अनेक नागरिकांनी अनधिकृत नळजोड घेतात तसेच काही जलवाहिन्या जीर्ण झाल्याने त्यांना पडलेल्या छिद्रातून दूषित पाणी जलवाहिनीत शिरण्याची शक्यता आहे. जलवाहिन्यांना पडलेले छिद्र, तसेच अनेक नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी बंद होण्याच्या वेळेस दूषित पाणी जलवाहिन्यांमध्ये शिरते. त्यामुळे दूषित पाणी पुरवठा होऊन आरोग्यला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

दुषित पाणी पिल्याने पाण्यामुळे होणारे आजारांचे दररोज 10 ते 12 रुग्ण उपचार करण्यासाठी येत असून त्यांना जुलाब, उलट्या, पोटदुखी आदी आजारांची लागत होत असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. प्रशासनाने नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम गेल्या काळात केले होते. जलवाहिनीतून नळजोड देण्याचे अधिकार पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे आहेत. मात्र, अनेक नागरिक अनधिकृतरित्या नळजोड घेत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जलवाहिन्या गटारीतून काढून त्या स्वतंत्र जागेतून टाकण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हे ही वाचा :

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी आज पंढरपुरात, सत्तावीस दिवसांचा अखंड प्रवास

पुणे : ‘एसआरए’च्या बोगस लाभार्थींची चौकशी ; दोषींवर गुन्हे दाखल होणार

Back to top button