राधिका शहा-वाघोलीकर
पुणे
बारामतीच्या राधिका शहा देणार अमेरिकेतील वार्षिक परिषदेत प्रशिक्षण
बारामती; पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेतील लासव्हेगास येथे होणाऱ्या अमेरिकन सोसायटी फाॅर मेटॅबोलिक अॅण्ड बेरियाट्रीक सर्जरीज (एएसएमबीएस) या जगातील सर्वोच्च संस्थेच्या वार्षिक परिषदेमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी बारामतीच्या राधिका मिलिंद शहा- वाघोलीकर यांची निवड झाली आहे. जगभरातील नामांकित सर्जन व डायटीशियन्स यांना या परिषदेत राधिका या प्रशिक्षण देणार आहेत.
दरवर्षी जगभरातील काही निवडक संशोधन करणाऱया व्यक्तिंना ही संधी दिली जाते.
या नामांकित संस्थेच्या वार्षिक परिषदेमध्ये जगभरातील डाॅक्टर व डायटेशन यांना प्रशिक्षण देण्यासाठी निवडहोणाऱ्या राधिका या पहिल्या भारतीय डायटिशिअन ठरल्या आहेत. २५ जून रोजी त्या या परिषदेसाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अत्यंत निवडक व्यक्तिंनाच आपले विचार व्यक्त करत प्रशिक्षण देण्याची संधी मिळते. यंदा बारामतीच्या राधिका शहा यांना हा सन्मान मिळाला आहे. अमेरिकेत त्या अतिस्थूल व्यक्तिंसाठी आहाराचे नियोजन कसे असावे, याविषयी मार्गदर्शन करतील.
आगॅस्ट २०२३ मध्ये इटलीतील नेपल्स येथे होणाऱया इंटिग्रेटेड फेडरेशन फाॅर सर्जरी फाॅर ओबेसिटी अॅण्ड मेटॅबोलिक डिस आॅर्डर (आयएफएसअो ) या परिषदेमध्ये अनुभवी आहार तज्ज्ञ म्हणून राधिका यांना व्याख्यानासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी या परिषदेसाठी पाठविलेला शोधनिबंध हा जगातील सर्वोच्च पहिल्या आठ शोधनिबंधकामध्ये निवडला गेला आहे. या शोधनिबंधाचे सादरीकरण त्या या परिषदेत करतील.
त्यांनी यापूर्वी मलेशिया, बेल्जियम, इंग्लड, फिलिपाईन्स तसेच भारतातील अग्रगण्य परिषदांमध्ये भाग घेतला आहे. अोबेसिटी म्हणजेच स्थुलत्व या विषयावर त्या गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील नामांकित तज्ज्ञ डाॅ. शशांक शहा यांच्या समवेत काम करत आहेत. त्यांच्या अनेक शोधनिबंधांना जागतिक स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. आहार कसा असायला हवा, याविषयी त्यांनी कोविड काळात राज्यात प्रभावी काम केले होते. येथील अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सचिव मिलिंद शहा-वाघोलीकर यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे बारामतीच्या नावलौकीकात भर पडली आहे.
हेही वाचा

