Mumbai Police: मुंबई, पुणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी; मुंबई पोलिसांना फोन | पुढारी

Mumbai Police: मुंबई, पुणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी; मुंबई पोलिसांना फोन

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबई पोलिसांना (Mumbai Police)  पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करून धमकी देण्यात आली. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी या फोनवरून देण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. अंधेरी, कुर्ला भागात शनिवारी (दि.२४) ध्याकाळी साडेसहा वाजता स्फोट करण्याची धमकी या कॉलवरुन दिली आहे.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) यूपी पोलिसांच्या मदतीने धमकीचा फोन करणाऱ्याला ३० वर्षीय आरोपीला अटक करून मुंबईत आणले आहे. दरम्यान, आरोपीने वेगवेगळी नावे सांगितली आहेत. त्याने पोलिसांना आपले खरे नाव सांगितलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपासाला सुरूवात केली आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, एका कॉलरने गुरूवारी सकाळी १० वाजता पोलीस कंट्रोल रुमला फोन केला. आणि शनिवारी (दि.२४) संध्याकाळी ६.३० वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. तसेच आपल्याला २ लाख रुपयांची गरज आहे. ही रक्कम मला मिळाल्यास हा बॉम्बस्फोट मी रोखू शकतो. तसेच, पुण्यातही बॉम्बस्फोट होणार असल्याचे त्याने सांगितले. मला २ लाख रुपये मिळाल्यास मी मलेशियाला जाणार असल्याचे त्यांने सांगितले.

हेही वाचा 

Back to top button