अखेर पिंपरी-चिंचवड पालिका संकेतस्थळ ‘अपडेट’

अखेर पिंपरी-चिंचवड पालिका संकेतस्थळ ‘अपडेट’
Published on
Updated on

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून गायब झालेली ह क्षेत्रीय कार्यालयाबाबतची माहिती गुरुवारी (दि. 22) झळकली. तसेच, ग क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांची माहिती देण्यात आली आहे. महापालिकेच्या ुुु. लिालळपवळर. र्सेीं. ळप संकेतस्थळावर ह क्षेत्रीय कार्यालयाची माहिती दिलेली नव्हती. तसेच, ग क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांची माहिती देखील या संकेतस्थळावर उपलब्ध नव्हती. याबाबत दैनिक 'पुढारी'ने महापालिका संकेतस्थळावरुन ह क्षेत्रीय कार्यालय गायब हे वृत्त गुरुवारी छायाचित्रासह प्रसिद्ध केले.

त्याची तातडीने दखल घेऊन महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने कासारवाडी येथील ह क्षेत्रीय कार्यालयाची माहिती दिली आहे. क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे यांचे छायाचित्र, नाव, संपर्क क्रमांक व मेल आयडी देण्यात आला आहे. तसेच, ग क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे यांचे छायाचित्र व माहिती देण्यात आली आहे. संकेतस्थळावर ह व ग क्षेत्रीय कार्यालयाची माहिती दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news