अजितदादाच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच माझीही इच्छा! : सुप्रिया सुळे | पुढारी

अजितदादाच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच माझीही इच्छा! : सुप्रिया सुळे

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अजितदादाला संघटनेत काम करण्याची इच्छा आहे, याचा मला मनापासून आदर आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. अशा निर्णयाचा केडर, संघटनेत देखील चांगला संदेश जातो. एक कुटूंब म्हणून राष्ट्रवादी पक्ष काम करत असून माझ्या भावाच्या सर्व इच्छा पुर्ण होवो, हेच बहीण म्हणून मला वाटते असे मत खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित एका कार्यक्रमापुर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर कार्यक्रमात मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखविली होती. मला संघटनेतील कोणतेही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असेही अजित पवार म्हणाले होते. याबाबत गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या.

सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक कुटुंब म्हणून काम करतो. संघटनेत आजवर अनेक ज्येष्ट नेत्यांनी प्रदेशाध्यपदावर काम केलेले आहे. कुणाल्या कुठले पद द्यायचे याबाबतचा निर्णय हा संघटनात्मक पातळीवर घेतला जातो. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान ही राष्ट्रवादीची पुढची दिशा असेल.

गद्दार ही काही शिवी नाही

गद्दार शब्द वापरला तर जेलमध्ये टाकू, असे म्हणत आहेत. गद्दार ही काही शिवी नाही. ते म्हणू शकतात, आम्ही नाही म्हणू शकत? आम्ही बोललो तर आम्हाला जेलमध्ये टाकणार, हे चुकीचे आहे. पांडुरंग हा एकच देव आहे, जो म्हणतो मला भेटायला यायची गरज नाही. मी तुम्हाला भेटायला येईन. पण वारकऱ्यांवर होणारा हल्ला असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, या सर्व गोष्टींविरोधात लढायला हवे, असेही सुळे म्हणाल्या.

हेही वाचा:

पुणे : लग्नाचे अमिष देत युवतीला धमकावणार्‍यावर गुन्हा

यूपीएससीच्या नोट्स चोरीला गेल्या तरी खचली नाही, जिद्दीच्या जोरावर.. दर्शनाच्या मृत्यूनंतर मित्राची भावनिक पोस्ट व्हायरल

Monsoon Update: मान्सून मुंबईच्या उंबरठ्यावर; २४ जूनला दाखल होण्याचा अंदाज

 

Back to top button