Monsoon Update: मान्सून मुंबईच्या उंबरठ्यावर; २४ जूनला दाखल होण्याचा अंदाज | पुढारी

Monsoon Update: मान्सून मुंबईच्या उंबरठ्यावर; २४ जूनला दाखल होण्याचा अंदाज

पुढारी ऑनलाईन: जून महिना संपत आला तरी, मान्सून अद्याप बरसलेला नाही. मात्र २३ जून ते २५ जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रात हजेरी लावेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवला होता. अशा स्थितीत मान्सून मुंबईच्या उंबरठ्यावर आला असून, तो २४ जून रोजी मुंबईत दाखल होण्याचा नवीन अंदाज हवामान विभागाने आज (दि.२२ जून) दिलेल्या बुलेटिनमध्ये (Monsoon Update) वर्तवला आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

मान्सून सध्या रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघरच्या दिशेने पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल (Monsoon Update) आहे. मान्सून हळूहळू मुंबईच्या दिशेने आगेकूच करत असून, तो लवकरच मुंबईत पोहचणार आहे त्यामुळे तो लवकरच २४ जूनपर्यंत हा मान्सून मुंबईत पोहोचण्याची शक्यता असल्याचेही IMD मुंबईने आजच्या बुलेटिनमध्ये सांगितले आहे.

२३ ते २५ जून दरम्यान संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय- डॉ. होसाळीकर

राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय होत असून २३  ते २५ जून या कालावधीत तो कोकण, विदर्भ, मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात बरसण्यास सुरुवात करणार आहे. दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती यापूर्वी पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवर द्वारे दिली होती.

मान्सून संदर्भात बोलताना होसालिकर पुढे म्हणाले,  राज्यात २३ पासून मान्सून जोर धरणाच्या तयारीत आहे. २३ रोजी कोकण व विदर्भातून बरसण्यास सुरवात करेल. त्यानंतर २४ व २५ रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात तो बरसण्यास सुरुवात करेल. विजाच्या कडकडाटासह राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात होईल,असेही ते म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button