पुणे : लग्नाचे अमिष देत युवतीला धमकावणार्‍यावर गुन्हा

पुणे : लग्नाचे अमिष देत युवतीला धमकावणार्‍यावर गुन्हा

बारामती : पुढारी वृत्तसेवा : युवतीला लग्नाचे आश्वासन देत तिला अन्य ठिकाणच्या आलेल्या स्थळांना नकार देण्यास भाग पाडून तिला धमकावल्याप्रकरणी सकलेन नबीलाल शेख (रा. महिला सोसायटी, तांबेनगर, मूळ रा. निमसाखर, ता. इंदापूर) याच्या विरोधात बारामती तालुका पोलिसांनी धमकावण्यासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका युवतीने फिर्याद दिली. 2020 मध्ये तिची सकलेन याच्याशी ओळख झाली होती. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले.

त्या वेळी त्याने तिला मी तुझ्याशिवाय कोणासोबत लग्न करणार नाही, तूदेखील दुसरीकडे लग्न करू नको, असे सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने अन्य ठिकाणच्या स्थळांना नकार दिला. या दोघांच्या नात्याबद्दल दोन्ही कुटुंबांना माहिती होती. गेल्या चार महिन्यांपूर्वी त्याने तिच्या वागण्या-बोलण्यावर बंधने घातली होती. त्यामुळे फिर्यादीने पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. त्या वेळी पोलिसांनी त्याला बोलावून समज दिली होती. 10 जून रोजी त्याने तिला तांबेनगरजवळ बोलावले. तेथे त्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझ्या घरच्यांचा विरोध असल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी तिच्या मोबाईलवर संपर्क करीत 'मी तुझे दुसर्‍या कोणाबरोबर लग्न होऊ देणार नाही,' अशी धमकी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news