भोर : निवडणुका जवळ आल्या की श्रेयवाद आठवतो

भोर : निवडणुका जवळ आल्या की श्रेयवाद आठवतो
Published on
Updated on

भोर (पुणे); पुढारी वृत्तसेवा : लोकप्रतिनिधी म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा करून जनतेच्या मागणीनुसार विकासकामे करीत असतो. मात्र, सध्या तालुक्यात गढूळ आणि खालच्या थराचे राजकारण सुरू झाले आहे. विकासकामे आम्ही मंजूर करायची आणि दुर्‍यानेच त्याचे भूमिपूजन करायचे, असा प्रकार सुरू आहे. करायचे काही नाही आणि निवडणुका जवळ आल्या की श्रेयवादाचा मुद्दा पुढे करून जनतेची दिशाभूल करायची. सारे काही आम्हीच केले, असा आभास निर्माण केला जात आहे. उद्या या जागेचा सातबाराही आमचाच आहे, असे ते म्हणतील, अशी टीका राष्ट्रवादीचे नाव न घेता आमदार संग्राम थोपटे यांनी केली.

निगुडघर ते म्हसर या रस्त्याचे भूमिपूजन आमदार थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी निगुडघर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कामासाठी 3 कोटी 82 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निरा देवघर धरण भागातील रस्त्यांची कामे केली. धारांबे गावचा पूल, आपटी भावेखलला जोडणारा निरा नदीवरील पूल केला. शिंदेवाडी( शिरवळ) ते वरंधा घाट रस्त्याचे काम केले.

या मार्गाचे काँक्रिटीकरणासाठी 749 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असे सांगून निरा देवघर धरणाचे डावा कालव्याच्या नकाशाची माहिती देखील यांना सांगता येणार नाही, अशी बोचरी टीका थोपटे यांनी विरोधकांवर केली. कापूरव्होळ-भोर-वाई-सुरूर फाटा या रस्त्यासाठी 340 कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा रस्ता भोर तालुक्याला वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भोरचे माजी सभापती बाळासाहेब थोपटे, माजी जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, ख.-वि. संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, अमर शेडगे, अनिल सावले, राजगडचे संचालक सुभाष कोंढाळकर, दीपक गायकवाड, माजी सरपंच सुरेश राजिवडे, म्हसरचे सरपंच एकनाथ मसुरकर, गोळेवाडीचे सरपंच सतोष गोळे, निगुडघरच्या सरपंच मंगल कंक, किसन कंक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक बाजार समितीचे संचालक सुरेश राजिवडे यांनी केले. सरपच संतोष गोळे यांनी आभार मानले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news