पुणे : सिंहगड पोलिस ठाण्यातून बांगलादेशी चोरटे पसार | पुढारी

पुणे : सिंहगड पोलिस ठाण्यातून बांगलादेशी चोरटे पसार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेले दोन बांगलादेशी नागरिक सिंहगड पोलिस ठाण्याच्या आवारातून पसार झाले. ही घटना 7 जून रोजी घडली. याप्रकरणी परदेशी नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. रिदानुर रहेमान राकिब (वय 65, रा. पुरबो हाजीनगर, सारुल्ला ढाका, बांगलादेश), जाकीर कोबिद हुसेन (वय 42, रा. सारोकिया, हाजीपाडा,ता. डमेरा, जिल्हा ढाका, बांगलादेश) अशी दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या गुन्ह्यात दोन बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. येरवडा कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर त्यांची मुक्तता केली होती. दोन बांगलादेशी नागरिकांनी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने आदेश (रिस्ट्रीक्शन ऑर्डर) दिले होते. त्यानुसार सात महिने ते सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात राहत होते. पोलिसांकडून त्यांची जेवण, राहण्याची व्यवस्था केली होती. विशेष शाखेने त्यांना बांगलादेशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

याबाबत बांगलादेशी दूतावासाशी पोलिसांनी संपर्क साधला होता. मात्र, बांगलादेशी दूतावासाने पोलिसांना प्रतिसाद दिला नसल्याने सात महिने ते पोलिस ठाण्यात वास्तव्यास होते. 7 जून रोजी बांगलादेशी नागरिक पोलिस ठाण्यातून पसार झाले. सात वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी पाकिस्तानी गुप्तहेराला ताब्यात घेतले होते. त्याला पाकिस्तानात परत पाठविण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली होती. त्या वेळी पाकिस्तानी नागरिक सहकारनगर पोलिस ठाण्यातून पसार झाला होता.

हेही वाचा

कोल्हापूर : इंजिनिअरिंग, फार्मसी आणि डेंटल प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

मुंबई : जुहू कोळीवाडा समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

नगर : ‘बुर्‍हाणनगर’ जलवाहिनी पुन्हा फोडली

Back to top button