कोल्हापूर : इंजिनिअरिंग, फार्मसी आणि डेंटल प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन | पुढारी

कोल्हापूर : इंजिनिअरिंग, फार्मसी आणि डेंटल प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  दैनिक ‘पुढारी’ आणि भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर व दंत महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने इंजिनिअरिंग, फार्मसी आणि डेंटल प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 14) सकाळी 10 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा उपक्रम होणार आहे.

बारावी परीक्षेच्या निकालानंतर पुढील करिअरसाठी शैक्षणिक वाटांचा शोध विद्यार्थ्यांसह पालक घेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी आणि डेंटल क्षेत्रात करिअर करायचे असते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात योग्य मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळावे, हा उपक्रमाचा उद्देश आहे.

चर्चासत्रात इंजिनिअरिंग क्षेत्र करिअर संधी याविषयी प्राचार्य डॉ. विजय घोरपडे, फार्मसी करिअर संधीविषयी प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे मार्गदर्शन करणार आहेत. तर इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेश प्रक्रियेबाबत प्रा. असित कित्तूर आणि डेंटल प्रवेश प्रक्रियेबाबत डॉ. चेतन पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन

इंजिनिअरिंग फार्मसी व डेंटल प्रवेश प्रक्रिया विविध टप्प्यांमध्ये राबवली जाणार असून, या शिबिरात प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार्‍या आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात येणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन तसेच ऑप्शन फॉर्म कसा भरावा, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कॉलेज निवडीचे पर्याय आणि त्या पर्यायांची निवड कशी करावी, याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनातर्फे देण्यात येणार्‍या सवलती, स्कॉलरशिपची माहिती या उपक्रमात देण्यात येईल. विद्यार्थी व पालकांनी मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानद संचालक डॉ. एच. एम. कदम व प्राचार्य डॉ. विजय घोरपडे यांनी केले आहे. इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेश प्रक्रिया दि. 15 जून 2023 पासून सुरू होत आहेत. अधिक माहितीसाठी 18004196163 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Back to top button