मुंबई : जुहू कोळीवाडा समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले | पुढारी

मुंबई : जुहू कोळीवाडा समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जुहू कोळीवाडा येथे समुद्रात बुडालेल्या व बेपत्ता असलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचे मृतदेह मंगळवारी पहाटे सापडले. धर्मेश वालजी फौजिया (वय १६) व शुभम योगेश भोगनिया (वय १६) अशी त्यांची नावे आहेत. दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

जुहू कोळीवाडा येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बारा ते सोळा वयोगटातील पाच मुले बुडाली होती. यापैकी एकाला मच्छीमारांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र चार मुले समुद्रात बेपत्ता होती. या मुलांचा सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई अग्निशमन दलामार्फत शोध घेण्यात आला. यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात आला. पण अंधारामुळे शोध मोहीम रात्री बंद करण्यात आली. आज पहाटे धर्मेश फौजिया आणि शुभम भोगनिया ही दोन मुले समुद्रात आढळून आली. त्यांना बाहेर काढून तातडीने कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा : 

Back to top button