व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला येणार वेग! | पुढारी

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला येणार वेग!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) इंजिनिअरिंग, कृषी, अ‍ॅग्रिकल्चर, एमबीए, एमसीए, बी.एड. अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचा निकाल प्रसिद्ध झाल्याने, पुढील तीन दिवसांत प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे. इंजिनिअरिंग, अ‍ॅग्रिकल्चर, फार्मसी अशा पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी 15 जूनपासून नोंदणी करावी लागणार आहे.

सीईटी सेलकडून विविध प्रकारच्या व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी साधारण 19 सीईटी परीक्षा घेण्यात येतात. त्यापैकी 17 परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल सीईटी सेलच्या वेबसाइटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या परीक्षांपैकी सर्वांत महत्त्वाची समजली जाणार्‍या एमएचटी-सीईटीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे.

त्याचप्रमाणे एमबीए, एमसीए, विधी अशा महत्त्वाच्या सीईटींचा निकालही जाहीर झाला आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग, अ‍ॅग्रिकल्चर, फार्मसी, एमबीए, एमसीए, विधी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीईटी सेलने एकूण 23 अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत नोंदणी करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार 15 ते 26 जून या कालावधीत अभ्यासक्रमनिहाय नोंदणी करता येणार आहे.

बीएसस्सी नर्सिंगच्या प्रवेशासाठीची सीईटी रविवारी झाल्यामुळे, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी ही 26 जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेशप्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी हीींिीं:// लशींलशश्रश्र. ारहरलशीं. ेीस/ या सीईटी सेलच्या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अशी होणार नोंदणी

15 जूनपासून
एमबीए, एमसीए, लॉ (पाच वर्षे), बीए/ बीएस्सी -बीएड,
बीएड-एमएड, इंजिनिअरिंग, अ‍ॅग्रिकल्चर, बी-फार्म, एम-फार्म

16 जूनपासून
बी-एचएमसीटी, बी-प्लॅनिंग, बीएड, एमएड, बी-डिझाइन, एमई/एमटेक

18 जूनपासून
विधी (तीन वर्षे), एमपीएड, बीपीएड, एम-आर्च,
एम-एचएमसीटी

20 जूनपासून
बॅचरल ऑफ फाइन आर्ट्स,
एम-प्लॅनिंग

हेही वाचा

पुणे डीआरडीओ हनीट्रॅप प्रकरण : एटीएस तपास अधिकारी हाजीर हो!

हाडे कोरून बनवलेल्या १२ हजार वर्षांपूर्वीच्या बासर्‍या

बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ

Back to top button