बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ | पुढारी

बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये होणार्‍या बारावीच्या पुरवणी परीक्षेचे नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मंडळाकडून मुदतवाढ देण्यात आली असून, विलंब शुल्कासह 18 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

बारावीच्या पुरवणी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील श्रेयांक हस्तांतरण घेणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 9 जूनपर्यंत, तर विलंब शुल्कासाठी अर्जांसाठी अंतिम मुदत 14 जून होती.

आता 15 ते 18 जूनदरम्यान विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत 19 जूनपर्यंत चलनाव्दारे शुल्क भरायचे आहे. शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी 20 जूनची मुदत देण्यात आली आहे.अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येईल.

हेही वाचा

cyclone biparjoy : बिपरजॉय उद्या धडकणार; गुजरातला ऑरेंज अलर्ट

पुणे : डिजिटल परिवर्तनासाठी भारत सक्षम : राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

Nashik Crime : गोवंश वाहतुकदाराच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांना अटक

Back to top button