पुणे : ‘प्रथम अर्जास प्रथम प्राधान्य’नुसार दाखले | पुढारी

पुणे : ‘प्रथम अर्जास प्रथम प्राधान्य’नुसार दाखले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. पुढील प्रवेशासाठी विविध दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. मुदतीत दाखले देण्यासाठी नवीन संगणक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. त्यानुसार ‘प्रथम अर्जास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर या प्रणालीद्वारे ऑनलाइन दाखले वितरित केले जात आहेत.

दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालानंतर शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेश प्रकियेसाठी विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्याने जिल्हा प्रशासनाला दाखले देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी नागरी सुविधा केंद्रात हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी ऑनलाइन पद्धतीने दाखले देण्यात येत आहेत.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माण आदी अभ्यासक्रमांसाठी तातडीने दाखले न मिळाल्यास प्रवेशासाठी अडचणी येऊ शकतात. काही अभ्यासक्रमांसाठी तातडीने दाखले मिळणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवेशासाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. संगणकप्रणालीमुळे वरील अर्जांवर कार्यवाही केल्याशिवाय त्याखालील अर्जाबाबत काहीच करता येत नाही. त्यामुळे प्रथम येणार्‍या अर्जास प्राधान्य ही अट तात्पुरती स्थगित करण्याची विनंती राज्य शासनाकडे केली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा

पुणे : सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे : चंद्रकांत पाटील

पोलंडमध्ये हिटलरचा सोन्याचा खजिना!

cyclone Biparjoy Update : गुजरात सीमेवर धडकणार चक्रीवादळ; तीव्रता वाढली, गुजरातमध्ये यलो अलर्ट जारी

Back to top button