पोलंडमध्ये हिटलरचा सोन्याचा खजिना! | पुढारी

पोलंडमध्ये हिटलरचा सोन्याचा खजिना!

बर्लिन : पोलंडमध्ये खजिना शोधणार्‍या एका पथकाला अ‍ॅडॉल्फ हिटलरचे असे रहस्य सापडले, ज्याची आजवर कोणालाच कल्पना नव्हती. दुसर्‍या युद्धादरम्यान, नाजी सेनेशी संबंधित एका बंकरमध्ये हा खजिना हाती लागला असून, याची चोरी हिटलरने केली होती, असे मानले जाते.

मामेरकी बंकरमध्ये खोदकाम करत असताना हा सोन्याचा खजिना मिळाला. आश्चर्याची बाब म्हणजे, रेल्वे ट्रॅकच्या खाली 5 फूट खोलवर हा खजिना लपवण्यात आला होता. जॅक्विज हिस्टोरिकल अँड एक्सप्लोरेटरी असोसिएशनने हा दुर्मीळ शोध लावला. असोसिएशनचे एक पथक पोलंडमधील मामेरकी बंदरात खोदाई करत असताना या खजिन्याचा सुगावा लागला. ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हिटलरने युद्धादरम्यान चोरलेला खजिना रेल्वेच्या ट्रॅकखाली लपवला होता.

या पथकाने वार्मिया व माजुरी प्रांतात जमिनीच्या खाली पाच फूट खोदले असून, ही जागा हिटलरच्या बंकरपासून काही मैल अंतरावर जर्मन सेना कमांड हेडक्वॉर्टर स्थित आहे. मामेरकी संग्रहालयाचे संचालक प्लेबन्स्की यांनी सोशल मीडियावर या नव्या शोधासंदर्भात माहिती दिली.

जेथे खजिना मिळाला, ती खोली 1700 च्या दशकात पीटर द ग्रेटसाठी बनवली गेली होती. 1941 मध्ये सोव्हिएत संघाच्या हल्ल्यादरम्यान नाझींनी तेथे लूट केली. या लुटीपूर्वी तेथे महागडे दागिने, सोने मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतरही विविध ठिकाणी अनेकदा लूट झाली. या खजिन्याचा शोध लावणार्‍या पथकाने यापूर्वी गुप्त बंकरच्या एंट्री गेटची माहिती मिळाल्याचा दावा केला होता.

Back to top button