आंबेगाव पूर्वला शेतकरी गवार तोडणीत व्यस्त | पुढारी

आंबेगाव पूर्वला शेतकरी गवार तोडणीत व्यस्त

लोणी-धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी, वाळूंजनगर, लाखणगाव, पोंदेवाडी, जारकरवाडी, बढेकरमळा परिसरात गवार तोडणीची लगबग सुरू आहे. गवार बाजारात दाखल झाल्याने बाजारात चढउतार सुरू झाल्याने गवार उत्पादकांमध्ये नाराजी आहे. पूर्व भागात शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात गवार लागवड केली आहे. लागवडीनंतर गवार साधारण 40 ते 45 दिवसांत तोडणीला येते. गवारीचे सहा ते सात तोडे होतात. बाजारभाव चांगला मिळाला तर दोन पैसेही मिळतात. सध्या गवारीचा दहा किलोस 300 ते 400 रुपये बाजारभाव आहे, त्यामुळे शेतकरी समाधानी असले बाजार भावात चढउतार होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

यंदा या भागात पावसाने चांगली हजेरी लावल्याने व डिंभा उजव्या कालव्याच्या पाण्यामुळे शेतकरी तरकारी मालाकडे वळलेला दिसतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असले तरी हा भाग बागाईत असल्याने मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, असे शेतक-यांनी सांगितले. तरकारी मालाला चांगला बाजारभाव मिळाला नाही, तर भांडवल वसूल होत नाही, असे बाबाजी वाळूंज, अशोक जाधव आदींनी सांगितले.

हेही वाचा

पिंपरी : पालखी सोहळ्याच्या तयारीचा आयुक्तांकडून आढावा

बीड : नेकनुर ते मांजरसुंभा दरम्‍यान गवारी फाट्यावर लोखंडी गज उघडे पडल्‍याने अपघाताला निमंत्रण

बारामती तालुक्यात पालखी सोहळा तयारीचा घेतला आढावा

Back to top button